औरंगाबाद: स्टेट बँक ऑफ इडिया ही बँक चोरट्यांनी फोडल्याची घटना कन्नड तालुक्यातील चापानेर येथे मध्यरात्री घडली. आज सकाळी ही बाब उघडकीस आली. घटनास्थळी फिगंर प्रिट व डॉग स्कॉडने भेट दिली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
चापानेर येथील मुख्यरस्त्यावर असलेली स्टेट बँक ऑफ इडिया ही बँक शनिवारी व रविवारी बंद होती. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बँकेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यावर पाढरी चिकट पट्टी लावली. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. कट्टरने व रॉडने तिजोरीवर वार केले तरी देखील चोरट्यांना तिजोरी फोडण्यात यश आले नाही. बँकेतील कागदपत्रे आस्ताव्यस्त फेकले असून बँकेतील रोख रक्कम पळवण्यात चोरट्यांना यश आले नाही. चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला आहे. ही घटना आज सकाळी बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. बँक अधिकार्यांनी तात्काळ कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यासी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गाभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. आज सकाळी वरिष्ठ पोलिस अधीकार्यांना घटनास्थळी भेट देऊन फिगर प्रिंट तज्ज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण केले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.










